Breaking News

रोटरी क्लबच्या वतीने सायकल वाटप

कर्जत ः प्रतिनिधी

पोशीर येथील श्रमजीवी जनता विद्यामंदिर विद्यालयात अनेक गावांतून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, परंतु गावांमधून येणार्‍या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते. ज्या गावात रिक्षा, एसटी जात नाही अशा गावांमधील गोरगरीब, गरजू सुमारे 50 मुलींना रोटरी क्लब ऑफ देवनार यांच्या वतीने शनिवारी सायकलचे वाटप करण्यात आले. या वेळी रोटरी क्लब ऑफ देवनारच्या अध्यक्षा रोटेरीयन पद्मा कपूर, अजित पप्पू, सुरेंद्रनाथ लांबा, विवेक खंडलवाल, रोहिणी रवींद्र, कमांडर जाणा, नागेश भट्ट, विनीत अग्रवाल, अंकिता खंडेलवाल, अर्जुन तरे, अरुण मसने, सतीश मसने, तसेच अनेक ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेत चार ते पाच किमीवरून चालत येणार्‍या मुलींचे श्रम आणि वेळ वाचविण्याच्या दृष्टीने रोटरी क्लब ऑफ देवनार यांनी सायकल वाटप केल्याबद्दल त्यांच्या उपक्रमाचे शाळा, ग्रामस्थ आणि पालकांच्या वतीने कौतुक करण्यात आले. रोटेरीयन अर्जुन तरे यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीबद्दल कौतुक केले, तर अजित पप्पू यांनी यश मिळविण्यासाठी अभ्यास करून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साधण्याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षा पद्मा कपूर यांनी मुलींना सायकल वाटपाचा उद्देश सांगून अभ्यास करून विविध क्षेत्रांत यश मिळवावे आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याचे आवाहन केले. मान्यवरांच्या हस्ते देवपाडा, माले, आसे, फराटापाडा, वारे, कळंब, पोही, मानिवली आदी ठिकाणांहून येणार्‍या मुलींना मान्यवरांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply