रितेश-जेनेलियाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सची हजेरी

मुंबई : प्रतिनिधी

अभिनेत्री रितेश देशमुख आणि त्याची मॉडेल-अभिनेत्री पत्नी जेनेलिया डिसुझा यांच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सने हजेरी लावली. अर्थातच, त्यांचे पालकही या वेळी उपस्थित होते. मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या अभिनेता रितेश देशमुख याच्या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू असतानाच त्याची मुले आणि संपूर्ण कुटुंबसुद्धा बरेच चर्चेत आले आहे. याला निमित्त ठरत आहे, ते म्हणजे रितेशचा मुलगा रियान याचा वाढदिवस. रितेशच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हणून बी-टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या ’बच्चेकंपनी’सोबत हजर राहिली. या वेळी रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसुझा यांनी पाहुणे मंडळींचे स्वागतही केले. सलमान खानची बहीण, अर्पिता खान शर्मा आणि तिचा मुलगा या पार्टीला आले होते. अभिनेता विवेक ओबेरॉयही त्याच्या मुलासह या पार्टीत पाहायला मिळाला. अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत तिच्या मुलीसह पार्टीत सार्‍यांचे लक्ष वेधून गेली. या वेळी तिचा लूक पाहण्याजोगा होता. अभिनेता तुषार कपूर हासुद्धा त्याच्या मुलासोबत रियानच्या बर्थडे पार्टीला पोहोचला होता.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply