पनवेल ः बातमीदार डॉ. कीर्ती समुद्र यांच्या वतीने सलग 22व्या वर्षी मधुमेह मोडेम या विषयावर जनजागृतीतून मधुमेह नियंत्रण हा कार्यक्रम दि. 1 डिसेंबर रोजी नवीन पनवेल सेक्टर 6 येथील फडके विद्यालयामध्ये आयोजित केला आहे. यामध्ये डॉ. अरविंद (बाळासाहेब) लिमये, डॉ. अमित लंगोटे, डॉ. संजीव कालकेकर, डॉ. निशिता मेश्राम या तज्ज्ञ डॉक्टरांची व्याख्याने होणार आहेत. केवळ नाममात्र शुल्कामध्ये विविध तपासण्या व अल्पोपहार इत्यादींची व्यवस्था केली जाणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून 022-27454069, 40694070, 9679246050 या क्रमांकांवर संपर्क साधून मधुमेहरुग्ण व नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. कीर्ती समुद्र यांनी केले आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …