Breaking News

ग्रामीण भागात क्रिकेट स्पर्धांचा थरार

भाजप नेते अरुणशेठ भगत, परेश ठाकूर यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सध्या टेनिस क्रिकेटचा हंगाम बहरात येऊ लागला असून ठिकठिकाणी मर्यादित षटकांच्या स्पर्धा होत आहेत. अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील कोन आणि घोट येथे स्पर्धा रंगली. या ठिकाणी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 10) जाऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कोन येथे जय हनुमान क्रिकेट संघाच्या वतीने ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या एकदिवसीय स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.  उद्घाटन समारंभास रमेश घरत, काशिनाथ म्हात्रे, नाथा घरत, विजय म्हात्रे, मानसी म्हात्रे, किशोर म्हात्रे, संतोष घरत, राहुल घरत, नरेश शिसवे, महेंद्र घरत, जितू शिसवे, प्रशांत म्हात्रे, प्रदीप कोंडीलकर, सुयोग घरत, संजय म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रिकेटप्रेमी, खेळाडू उपस्थित होते. घोट गावात गावदेवी क्रिकेट क्लबच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. या वेळी तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनावणे, माजी नगरसेवक हरेश केणी, प्रवीण पाटील, आयोजक नितेश पाटील, नवनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रिकेटप्रेमी, खेळाडू उपस्थित होते.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply