उलवे : रामप्रहर वृत्त
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/11/ulave-sanvidhan-1024x762.jpg)
येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात मंगळवारी (दि. 26) भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान शिक्षक व्ही. जी. पाटील हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान दिनाच्या निमित्ताने विद्यालयात वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आदित्य खंदारे, साक्षी सावंत आणि सुरज नागमोते या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून भारतीय संविधानाचे महत्त्व सांगितले. व्ही. जी. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून 1935चा भारतीय कायदा आणि भारतीय संविधान याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख एस. आर. गावंड यांनी केले, तर आभार एस. डी. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बी. आर. चौधरी यांनी सहकार्य केले.