Breaking News

नगरसेविका प्रमिला पाटील यांचे सिडको अभियंत्यांना निवेदन

कळंबोली : रामप्रहर वृत्त

येथील से. 12 मध्ये शहरातील स्मशानभूमीच्या डागडुजीची मागणी नगरसेविका प्रमिला पाटील यांनी सिडको कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या स्मशानभूमीत आलेल्या मयताला जाळण्यासाठी लाकडे उपलब्ध नसतात. स्मशानभूमीमध्ये दुरवस्था निर्माण झालेली आहे. सध्या मंडप मोडकळीस आलेला आहे. वुडपायर बसविणे, तसेच परिसर साफसफाई, स्मशानभूमी रक्षकांच्या खोल्यांची डागडुजी व रंगरंगोटी करावी, अशाही काही मागण्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे बीयूडीपी अंतर्गत रस्ते व गटार नवीन करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला होता. आपण तीन वर्षानंतर त्या रस्त्याचे पॅचवर्कच्या कामाचा कार्यादेश काढला आहे, तरी त्या ठिकाणी पॅचवर्कचे काम न होता नवीन रस्ते, तसेच गटार तयार व्हावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली होती. आपण लवकरात लवकर या कामाला पूर्णत्व द्यावे अन्यथा आम्हाला जनतेची अडचण लक्षात घेऊन आंदोलन करावे लागेल, असा इशाराही शेवटी नगरसेविका प्रमिला पाटील यांनी निवेदनात दिला आहे.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply