Breaking News

म्युकरमायकोसिसचे नवी मुंबईत आढळले 23 रुग्ण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबईतही म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असून या रुग्णांची संख्या 23 पर्यंत गेली आहे. यात खासगी रुग्णालयात 19 तर महापालिका रुग्णालयांत चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 35 टक्के रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे. मागील आठवड्यात फक्त सात रुग्ण होते. नवी मुंबईत 10 मेनंतर म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची तयारी करीत असताना आता या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णवाढ होत असल्याने महापालिकेच्या तीन रुग्णालयांत यावर उपचार पद्धती सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर तज्ज्ञांची पथके बनविण्यात आली आहे. 19 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत हा बुरशीजन्य आजार असून तो करोना झालेल्या रुग्णांना होत असून यात इतर आजार असणार्‍यांना याचा धोका अधिक आहे. त्याचप्रमाणे करोना उपचारादरम्यान गरज नसताना दिलेल्या स्टेरॉइडमुळे होत आहे, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. खासगी रुग्णालयांत 19 तसेच महापालिकेच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात अधिगृहीत केलेल्या खाटांवर चार रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर आवश्यक नसताना काही वेळा रेमडेसिवीर व स्टेरॉईडचा वापर करावा लागतो. मधुमेह रुग्ण असेल तर उपचारादरम्यान त्याची शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे कोरोना उपचारानंतर मधुमेहावर नियंत्रण ठेवले पाहिजे. गरज नसेल तर कोरोना उपचारात स्टेरॉईडचा वापर करू नये, असा सल्ला आरोग्य अधिकार्‍यांनी दिला आहे.

नवी मुंबईत ही म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळत आहेत. या आजाराच्या उपचारासाठी लागणारे औषधे, इंजेक्शन यांचा सध्या तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे वेळीच रुग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना उपचारादरम्यान गरज असेल तरच स्टेरॉइडचा वापर करावा.

-डॉ. योगेश नारखेडे, कान, नाक, घसातज्ज्ञ, महापालिका, नवी मुंबई

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply