Breaking News

वाकण-पाली, खोपोली रस्त्यावरील अतिअवजड वाहनांची वाहतूक आता मुंबई-गोवा राष्ट्रीयमार्गे

अलिबाग : जिमाका

जिल्ह्यात झालेल्या अतिपर्जन्यवृष्टीमुळे व पुलावरून येणार्‍या-जाणार्‍या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने, तसेच जांभूळपाडा व बागूलपाडा पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली रस्त्यावरील 20 मे. टनापर्यंतची अवजड वाहतूक सुरू ठेवून त्यावरील सर्व प्रकारची अतिअवजड वाहतूक बंद करण्यात येत आहे.

सहा महिन्यांकरिता ही वाहतूक मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून वाकण-पेण-खोपोलीमार्गे वळविण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply