Breaking News

जबाबदार आणि शिस्तप्रिय व्हा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

उलवे : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल येथे तृतीय इन्वेस्टीचर समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते माजी खासदार व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर होते. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जबाबदार आणि शिस्तप्रिय व्हावे, असो मोलाचा सल्ला आपल्या मनोगतामध्ये दिला.
प्रमुख पाहुणे म्हणून गिरीश ठाकरे साहेब (एसीपी नवी मुंबई पोलीस), पनवेल महापालिका माजी सभागृह नेते व शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचे विद्यमान चेअरमन परेश रामशेठ ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, मॅनेजिंग कौन्सील सदस्य जोश्ना ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे असिस्टंट इन्स्पेक्टर विलासराव जगताप सर यांच्यासोबत एलआरटीपीएसचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, एलआरटीइ एमएसच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे व मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, यांच्यासमवेत विद्यार्थी पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी लोक उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर विद्यार्थ्यांनी रयत गीत व स्वागत गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली.
यानंतर स्वागत नृत्य सादर करण्यात आले व इन्वेस्टीचर कार्यक्रमास सुरुवात झाली क्रीडाशिक्षक संग्राम फोफेरकर, संगीत शिक्षक हर्षल फडके यांच्या प्रशिक्षणातून बँड पथकामार्फत विद्याथी संचलन करून स्टेजवर आले मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शपथ स्लॅश व ब्याच देण्यात आले.
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. यानंतर स्कूलचे चेअरमन परेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात कसे नाव कमवण्यासाठी कशी मदत होईल याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेल्या माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना जबाबदारी, शिस्तचे महत्त्व पटवून सांगितले. अशाप्रकारे राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली व कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात झाला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply