Breaking News

माथाडी कामगारांना अन्नधान्याचे वाटप

कोटक महिंद्रा बँकेचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

अन्नधान्याचा पुरवठा कायम राहिला पाहिजे यासाठी कोरोना विषाणू संसर्गाच्या काळातही कायम कार्यरत असलेल्या माथाडी कामगारांच्या कष्टांना बळ देण्यासाठी नवी मुंबईमध्ये कोटक महिंद्रा बँकेने कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांना अन्नधान्याचे वाटप केले.

देशाच्या कानाकोपर्‍यात अन्नधान्याचा अविरत पुरवठा कायम रहावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती महत्त्वाची भूमिका बजावतात. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कारभार सुरळीत चालण्यासाठी हमाल अर्थात माथाडी कामगार त्यांची कार्ये योग्यरीत्या पार पाडतात. धान्य, भाजीपाला आणि फळे सातत्याने गाड्यांमध्ये भरून आणि गाड्यांमधून रिकामे करून ते खाद्य पदार्थांचा पुरवठा कायम रहावा यासाठी प्रयत्न करतात. नवी मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, जोधपूर, नवी दिल्ली आणि इंदोरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांना कोटक अन्नधान्याचे वाटप करतआहे.

कोटक महिंद्रा बँकेच्या कमर्शियल बँकिंग विभागाचे ग्रुप प्रेसिडेंट डी. कानन म्हणाले, माथाडी कामगार देशाच्या कानाकोपर्‍यात भाजीपाला, फळे आणि विविध कृषी उत्पादने यासारख्या खाद्य पदार्थांच्या वितरण साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. कोविड 19 च्या साथीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नियमित व्यवहारांमध्ये अनेक अडथळे आले, परिणामी या रोजंदारी कामगारांचे नुकसान झाले. यांना अन्नधान्याचे वितरण करणे ही यांच्या कष्टाची दखल घेण्याचा आणि या कठीण काळात यांना व यांच्या कुटुंबाला मदत करण्याचा आमचा छोटा प्रयत्न आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply