Breaking News

एका षटकात हॅट्ट्रिकसह पाच बळी

कर्नाटकच्या गोलंदाजाचा अनोखा विक्रम

सुरत : वृत्तसंस्था

कर्नाटकचा वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुन याने हॅट्ट्रिक घेत एका षटकात तब्बल पाच विकेट्स घेण्याचा अनोखा विक्रम केला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत हरियाणाविरुद्ध खेळताना मिथुनने 39 धावा देऊन पाच गडी बाद केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने सामन्याच्या शेवटच्या षटकात पाच विकेट्स मिळवले.

मिथुनने शेवटच्या षटकात अनुक्रमे हिमांशू राणा (61), राहुल तेवतिया (34), सुमित कुमार (0), अमित मिश्रा (0), जयंत यादव (0) यांना बाद केले. अभिमन्यू मिथुन हा देशांतर्गत क्रिकेट टी-20 सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा पहिलाच गोलंदाज आहे. याआधी मिथुनने विजय हजारे क्रिकेट स्पर्धेतही तामिळनाडूविरुद्ध खेळताना हॅट्ट्रिक केली होती.

हरियाणा आणि कर्नाटक या संघांमध्ये स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरी सामना खेळला गेला. या सामन्यात हरियाणाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 194 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना कर्नाटक संघाने केवळ 15 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात 195 धावा करून सामना जिंकला व अंतिम फेरीत धडक मारली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply