Breaking News

रेल्वे स्थानकांत लसीकरणाला चांगला प्रतिसाद

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

लोकल प्रवासावरील काही निर्बंध हटिवण्यात आल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने प्रवाशांसाठी श्गहरातील पाच रेल्वे स्थानकांवर लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. शहरातील इतर केंद्रांवर लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसला तरी या केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या केंद्रांवर 11,120 लसमात्रा देण्यात आल्या असून यात दुसरी लस घणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे.

नवी मुंबई कोरोना लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत 21 लाख 11 हजार 748 लसमात्रा देण्यात आल्या आहत. यात पहिली मात्रा घतलेल्यांची संख्या 12 लाख 12 हजार 695.असून दोन्ही लसमात्रा घतलेले आठ लाख 99 हजार 053 इतके आहेत. शहरात लसीकरणासाठी पात्र असलेल्यांची संख्या 11 लाख सात हजार गृहीत धरली होती. या नुसार पहिल्या मात्राचे लसीकरण पूर्ण झाले आहे, मात्र दुसरी मात्रा घेतलेल्यांची संख्या अद्याप कमी असून ती 80 टक्क्यांपर्यंतच आहे. यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महापालिकेच्या विविध रुग्णालयांसह 20 मार्केट, 23 नागरी आरोग्य केंद्र तसेच 5 रेल्वेस्थानकावरही लसीकरण सुविधा देण्यात येत आहे. याशिवाय शहरात फिरत्या वाहनांद्वारे लसीकरण केले जात आहे. यात रेल्वे स्थानकावरील केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नवी मुंबईतून रेल्वेमार्गाने प्रवास करणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे वाशी, नेरूळ, घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली पाच प्रमुख स्थानकावर लसीकरण सुविधा सुरू आहे. या सर्वस्थानकांवरील पहिली लस मात्रा घेणार्‍यांपेक्षा दुसरी लसमात्रा घेणार्‍यांची संख्या अधिक आहे. कामाच्या ठिकाणी जाताना किंवा घरी परत येताना रेल्वेप्रवासी लसीकरण करून घेत आहेत.

नवी मुंबईकर नागरिकांना लसीकरणासाठी विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली असून रेल्वेस्थानकावर असलेल्या लसीकरण केंद्रामुळे लस घेणार्‍या रेल्वेप्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध असून त्या ठिकाणी दुसरी लसमात्रा घेणार्‍यांची संख्या अधिक आहे.

-डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply