कर्जत : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या कर्जत मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षपदी अॅड. प्रिती तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशानुसार कर्जत तालुका महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा गोगटे यांनी अॅड. प्रिती तिवारी यांची कर्जत मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अॅड. प्रिती तिवारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनिल गोगटे, ठाणे कोकण विभाग सोशल मीडिया संयोजिका अॅड. गायत्री परांजपे, सुषमा ढाकणे, स्नेहा गोगटे, सुप्रिया भगत, अभिषेक तिवारी, अंकिता तिवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.