रेवदंडा : प्रतिनिधी
रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने अलिबाग तालुक्यातील चिचोंटी येथे जिल्हा कुस्ती अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. 1) झाले.
उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस मारुती आडकर, पनवेल तालुका अध्यक्ष बळीराम पाटील, वरंडे ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर चेरकर, चिंचोटीच्या सरपंच बिंदीता पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष
बाबूराव पाटील, बेलोशी ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा भोपी, विश्वनाथ मळेकर, अलिबाग तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत, कर्जत तालुका अध्यक्ष भगवान धुळे, पेण तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे, खालापूर तालुका अध्यक्ष मंगेश दळवी, रोहा तालुका अध्यक्ष नंदुशेठ म्हात्रे, उपाध्यक्ष दत्तात्रेय पाटील, कार्याध्यक्ष सुभाष घासे, खजिनदार दत्तात्रेय पालांडे, सहचिटणीस रवींद्र घासे, सहचिटणीस गजानन हातमाडे आदी उपस्थित होते.
स्पर्धा विविध गटांत व प्रकारांत होत असून, प्रत्येक गटातील एक विजेता निवडण्यात येणार आहे. स्पर्धेत पंचाचे काम गजानन हातमोडे, वैभव मुकादम, राजाराम कुंभार, सुनील नांदे, सुधाकर पाटील, प्रमोद भगत, सावळेराम पायमोजे, जयेंद्र भगत, तसेच सहाय्यक पंच म्हणून रवींद्र घासे, सौरभ पाटील, प्रतिज्ञा भोईर, रूपाली शिंदे, विजय भगत, जितू गांवड, लक्ष्मण पाटील, तसेच वेळाधिकारी म्हणून यतिराज पाटील, संदीप मोरे, प्रसन्ना पाटील, राम म्हसकर, आदेश पेके, जयराम गवते, तर समालोचक म्हणून भालचंद्र भोपी, विलास पाटील, पंढरीनाथ पाटील, रमेश लोभी, हिरामण भोईर काम पाहात आहेत.