Breaking News

निजामपुरात घरफोडी; पाच हजारांची रक्कम लंपास

आणखी पाचघरे फोडली

माणगाव ः प्रतिनिधी

तालुक्यातील निजामपूर गावातील शिर्की आळीत अज्ञात चोरट्याने घरातील पाच हजार रुपये रोख रक्कम चोरली, तसेच अन्य पाच लोकांचे गोडाऊनच्या घराचा कडीकोयंढा तोडून चोरी केली.  याबाबतची फिर्याद जनार्दन दगडू मोरे रा.निजामपूर शिर्की आळी  यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

अज्ञात चोरट्याने फिर्यादी जनार्दन मोरे यांच्या घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून पाच हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली, तसेच नितीन खैरनार, मंगेश कोळवणकर यांचे गोडाऊन, नथुराम शिर्के व शोभा प्रभाकर वडके यांच्याही घरात प्रवेश करून घरफोडी करून अज्ञात चोरटा फरार झाला आहे. या गुन्ह्याची माहिती मिळताच माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील,माणगाव पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री.तुणतुणे हे करीत आहेत.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply