Tuesday , February 7 2023

आमदार प्रशांत ठाकूर यांची उरण भाजप कार्यालयास सदिच्छा भेट

उरण : वार्ताहर

भाजप जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 2) उरण भाजप कार्यालयास सदिच्छा भेट दिली. भाजप जिल्हा सरचिटणीस तथा आमदार महेश बालदी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत केले. 

या वेळी उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजपचे उरण शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शहा, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, बोकडवीरा ग्रामपंचायतीचे सदस्य शेखर पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान, याच ठिकाणी प्रो कबड्डीपटू निलेश शिंदे याने आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांची भेट घेतली. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी निलेशला नव्या हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply