Breaking News

पनवेल येथे श्री दत्त महोत्सव

पनवेल ः रामप्रहर वृत्त

नवनाथपंथीय गुरुवर्य दादामहाराज वाघिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. 11) रोजी श्री दत्त महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवामध्ये सकाळी अभिषेक, सत्यदत्त महापुजा, सायंकाळी श्री दत्त जन्मोत्सव, पालखी सोहळा, दर्शन, महाप्रसाद व भंडारा असे धार्मिक कार्यक्रम आहेत. पनवेल येथील विश्राळी तळयाजवळच्या मुंबई-पुणे हायवेच्या लगत असणार्‍या श्री दत्तनाथ मंदिरात हा महोत्सव आयोजित केलेला आहे. सर्व भक्तांनी या महोत्सवास भेट देऊन दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply