Breaking News

भाजप प्रवेशाचा धडाका सुरूच; उसरोलीमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेऊन अनेक जण भाजपत प्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत उसरोलीतील साामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपत जाहीर प्रवेश केला. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

भारतीय जनता पार्टीची विकासकामे पाहता, उसरोलीमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. यामध्ये बाळू माने, विकास पाटील, प्रमोद काळे, सचिन जाधव, शिवाजी देवकर यांच्यासह अनेकांनी भाजपत प्रवेश केला.

या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सरपंच गणेश भगत, मच्छिंद्र पाटील, जयवंत भगत, विजय भगत, संजय भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

– कळंबोलीतील उत्तर भारतीय युवक सहभागी

भारतीय जनता पार्टीची विकासकामे पाहता अनेक जण पक्षात प्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत कळंबोलीमधील   उत्तर भारतीय युवकांनी रविवारी भाजपत जाहीर प्रवेश केला. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

कळंबोलीमधील उत्तर भारतीय युवकांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. यामध्ये अतुल मिश्रा, प्रेम शहा, विशाल पाल, अनुप तिवारी, शुभम तिवारी, अनंद कुमार यांच्यासह अनेकांनी भाजपत प्रवेश केला. या वेळी तालुका उपाध्यक्ष डी. एन. मिश्रा, तालुका युवा उपाध्यक्ष जमीर शेख, शहर अध्यक्ष रवीशेठ पाटील, शहर उपाध्यक्ष नितीन काळे, प्रशांत रणवरे, प्रियंका पवार, अमर ठाकूर, अशोक मोटे, राजेंद्र बनकर, नगरसेवक अमर पाटील, प्रकाश महानवर, केशव यादव, गगनदीप बंदेशा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply