कर्जत : प्रतिनिधी
हैद्राबाद येथील डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर अमानुषपणे अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली, या घटनेचा कर्जत शहर भाजपच्या वतीने (दि. 4) निषेध करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा कल्पना दस्ताने यांनी डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर अत्याचार करून त्यांची हत्या करणार्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.
सदर घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी संध्याकाळी शहरातील लोकमान्य टिळक चौकात उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजपचे जिल्हा चिटणीस दिपक बेहेरे, तालुका चिटणीस पंकज पाटील, ज्येष्ठ नेते वसंत सुर्वे, शहर अध्यक्ष दिनेश सोलंकी, शहर सरचिटणीस सुर्यकांत गुप्ता, मंदार मेहेंदळे, राहुल कुलकर्णी, किसन मोर्चा प्रदेश चिटणीस सुनील गोगटे, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष स्नेहा गोगटे, उपाध्यक्षा गायत्री परांजपे, सरचिटणीस स्नेहा पिंगळे, रजनी वैद्य, माधवी मित्रगोत्री, स्वप्ना सोहोनी, लीना गांगल, सरू चौधरी, प्रज्ञा परांजपे, श्रध्दा परंगे, तन्वी जोशी, प्राची उगले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
खोपोलीत निषेध रॅली
खोपोली : प्रतिनिधी
हैदराबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर बलात्कार व हत्या करणार्या नराधमांना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, देशात व राज्यात महिला आणि तरुणींना पूर्ण संरक्षण मिळण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी खोपोली शहरात गुरूवारी (दि. 5) निषेध रॅली काढण्यात आली.
या रॅलीत येथील विविध शाळांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला बचत गट कार्यकर्त्या, विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शीळफाटा ते खोपोली पोलीस स्टेशन अशी ही रॅली काढण्यात आली होती. पोलीस अधिकार्यांना
निवेदनपत्र देण्यात आले.