Breaking News

कोरोनाचा सामना करण्यासाठी उरणमध्ये 40 खाटांचे इस्पितळ

उरण : प्रतिनिधी

राष्ट्रीय आपत्ती म्हणुन घोषित करण्यात आलेल्या कोरोनाचा सामना आणि निवारण करण्यासाठी उरण तालुक्यात युध्दपातळीवर तयारी करण्यात आली आहे. आपातकालीन परिस्थीतीवर मात करण्यासाठी 40 खाटांचे एक इस्पितळाचेच अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.  राष्ट्रीय आपत्ती म्हणुन घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोनाचे समुळ उच्चाटनासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी संसर्ग जन्य कोरोनाचा प्रसार होणार याची दक्षता घेण्याचे  जिल्हा प्रशासनाला संक्रांतीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर कोरोनामुळे उद्भवणार्‍या संभाव्य परिस्थतीचा सामना करण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून तालुक्यातील बोकडवीरा येथील खासगी केअर पॉईंट इस्पीतळच अधिग्रहण करण्यात आले आहे. या केअर पॉईंट इस्पीतळामध्ये 40 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जेएनपीटीच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्येही आपातकालीन म्हणून आणखी आठ खाटांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती उरण तहसिलदार यांनी दिली आहे. उरण परिसरात 15 ते 31 मार्चदरम्यान होणार्‍या मोर्चे, जाहीर सभांच्या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा सामना आणि निवारण करण्यासाठी उरण तालुक्यात युध्दपातळीवर तयारी करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply