Breaking News

सीकेटी महाविद्यालयात स्वच्छता मोहीम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातर्फे प्लास्टिक जागरूकता आणि स्वच्छता मोहीम शनिवारी (दि. 7)  राबविण्यात आली. एनसीसी विभागातर्फे खांदा कॉलनी, नवीन पनवेल तसेच खांदेश्वर रेल्वेस्टेशन परिसरात ही मोहीम यशस्विरीत्या राबविली. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे कला शाखा व एनसीसी विभागाचे प्रमुख मा. कॅप्टन डॉ. यू. टी. भंडारे, एनसीसी ऑफिसर प्रा. नीलिमा तिदार तसेच 85 एनसीसी कॅडेट्स या सर्व जणांनी सहभाग घेतला होता. मोहिमेंतर्गत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक घनकचरा जमा करण्यात आला. या मोहिमेमुळे प्लास्टिक वापराविषयी जागरूकता निर्माण करण्यात यश आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, कॅप्टन डॉ. यू. टी. भंडारे, एनसीसी ऑफिसर प्रा. नीलिमा तिदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply