Monday , January 30 2023
Breaking News

चांगू काना ठाकूर विद्यालयात प्रदर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालयात शनिवारी (दि. 7) ’विज्ञानयत्री’ अंतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांमध्ये  वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा यामागचा उद्देश आहे. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माजी विद्यार्थिनी डॉ. प्रियांका गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी संतोष चव्हाण, संध्या अय्यर आणि शिक्षक-पालक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे व परीक्षकांचे स्वागत प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.  या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन, घरगुती कुलर, बबल मशिन, वनस्पतींचे आपल्या जीवनातील महत्त्व, पाण्याचा छोटा पंप, हायड्रोलिक लिफ्ट, चांद्रयान, हवेत उडणारा फुगा, हवेच्या दाबामुळे फिरणारे भिरभिरे, घरगुती फ्रीज आदी प्रतिकृती या प्रदर्शनात तयार केल्या होत्या. विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी आणि सर्व शिक्षक, कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply