पनवेल : रामप्रहर वृत्त
कष्टकर्यांचे द्रष्टे नेते व थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात 27 जानेवारी ते 3 फेबु्रवारीदरम्यान स्व. श्री. जनार्दन भगत स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेला संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि.31) भेट देत मार्गदर्शन केले.
भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या वतीने क्रिमिनल जस्टीस या विषयावर ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी कायदेशीर दिग्गजांना एकत्र आणून समकालीन कायदेशीर समस्यांबद्दल त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांना मिळावे हा या मागचा उद्देश आहे. त्यानुसार 27 जानेवारी रोजी क्रिमिनल जस्टीस सिस्टम या विषयावर अॅड. दिलीप शिंदे यांनी, 29 जानेवारीला अॅड. गजानन चव्हाण यांनी बेल अॅप्लिकेशन, 30 जानेवारीला जस्टीस प्रदीप देशमुख यांनी गुन्हेगारी पुराव्याचे मूल्यांकन, तर बुधवारी व्हिक्टीमोलॉजी या विषयावर डॉ. डी.वाय.पाटील स्कूलच्या डायरेक्टर डॉ. करुणा मालविय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे भागातील विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ. एस.टी. गडदे, भागुबाई चांगू ठाकूर कॉलेजच्या प्राचार्य सानवी देशमुख, प्रा. अपराजिता गुप्ता, समृद्धी टीवांटने, राजदीपा मढवी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
Check Also
सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक
प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …