मोहोपाडा ः वार्ताहर
चौक येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल विद्यालयात विविध उपक्रमांतर्गत पूर्व प्राथमिक विभागात फळे व भाजीपाला प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये विद्यालयाचे संचालक योगेश्वर स्वामीजी, आत्मस्वरूप स्वामीजी, मुख्याध्यापक जॉन्सन व इतर शिक्षकवृंद यांनी लहान विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या वेळी आहार व आजचे जीवन यावर मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या फास्ट फूड व धकाधकीच्या जीवनात आपण आपले आरोग्य गमावून बसलो आहोत. बदलती जीवनशैली व झपाट्याने वाढणार्या शहरीकरणामुळे बेकरी, पिझ्झा, बर्गर यांच्या आहारी आपण गेलो आहोत. यामुळेच फळे व भाजीपाला यांचे महत्त्व ओळखून त्यांचा आपल्या आहारात समावेश करण्याच्या हेतूने व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे
शिक्षकांनी सांगितले.
विद्यार्ध्यांनी विविध भाज्या व फळे यांचा वापर करून आकर्षक सजावट करून प्रदर्शन भरवले होते. या उपक्रमातून आपल्या आहारात सर्व प्रकारच्या भाज्या व फळे यांचा समावेश असावा, असा संदेश देण्यात आला.