Tuesday , February 7 2023

दारावे संघ आमदार चषकाचा मानकरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
हावमा एज्युकेशन अ‍ॅण्ड सोशियल असोसिएशन आणि स्टार क्रिकेट क्लब ओवे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद दारावे येथील मच्छिंद्र स्मृती संघाने पटकाविले. या संघाला दोन लाख रुपये व भव्य चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, तर बक्षीस वितरण सोहळ्यास अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख यांची उपस्थिती लाभली.
स्पर्धेत द्वितीय क्रमांक शिवशक्ती खारघर, तृतीय जय हनुमान कामोठे, तर चतुर्थ क्रमांक व्हीव्हीसी उसारघर संघाने पटकाविला. द्वितीय क्रमांकास एक लाख रुपये, तर तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळविलेल्या संघांना प्रत्येकी 50 हजार रुपये व चषक देण्यात आला. मालिकावीराचा मान खारघर संघाच्या सुरज पाटीलने मिळविला. त्याला चारचाकी अल्टो कार बक्षीस देण्यात आली. अंतिम सामन्यात दारावे संघाचा धीरज म्हात्रे सामनावीर ठरला. कामोठे संघाच्या रोशन म्हात्रेने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करीत एलईडी टीव्हीचे पारितोषिक मिळविले, तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून उसारघर संघाचा तेजस म्हात्रे, तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून दारावे संघाच्या
सिद्धेश म्हात्रे यांनी मान मिळविला. त्यांना दुचाकी देण्यात आली. स्पर्धा यशस्वितेसाठी भाजप अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष मन्सूर पटेल, सलीम पटेल, रईस पटेल, अ‍ॅड. इर्शाद शेख, नूर पटेल, मुख्तार पटेल व सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply