Breaking News

भक्तीमय वातावरणात श्रीदत्त जयंती साजरी

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दत्तगुरुंचे मनोभावे दर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जप करीत मोठ्या भक्तिभावाने पनवेल तालुक्यात दत्तजयंती सोहळा साजरा करण्यात आला. त्या निमीत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी वावंजे, मोर्बे, रिटघर, दूंदरे या ठिकाणी आयोजित केलेल्या दत्तजयंत्ती उत्सवांना भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले.

पनवेल शहरासह परिसर व ग्रामीण भागामध्ये दत्त जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य राज पाटील, प्रकाश खैरे, बशीर शेख, कान्हा पाटील, तुकाराम पाटील, डॉ. लक्ष्मण कडू, गोपीनाथ भोपी, प्रकाश भोपी, संभाजी भोपी, वंदना भोपी, रवि पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होेते.

श्रीदत्त जयंतीनिमित्त तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात दत्ताच्या देवळात भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळच्या वेळी दत्ताचा जन्म झाला असे मानतात, त्यामुळे सायंकाळी कीर्तन होते. म्हणून अनेक मंदिरांवर रोषणाई केली होती. तसेच काही गावांमध्ये या उत्सवाच्या वेळी संपूर्ण सप्ताह विविध कार्यक्रम ठेवले जातात. केवळ शहरातच नाही तर लहान गावातही श्रीदत्त जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी मंदिरामध्ये आलेल्या भक्तांसाठी अन्नदान आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply