Breaking News

हे सरकार गोरगरीबांचे की दारूवाल्यांचे?

महाविकास आघाडीला भाजपचा सवाल

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा देत परवाना शुल्कात 50 टक्क्यांची कपात केली आहे. यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सर्वसामान्य जनता भरमसाठ वीज बिलात सवलत मागत होती. त्यासाठी रस्त्यावरही उतरली. तरीही या सरकारने सूट दिली नाही. घरपट्टी, पाणीपट्टी असेल कशातच सामान्य माणसांना दिलासा दिला नाही, मात्र दारूवाल्यांना लगेच सूट देण्यात आली, असे म्हणत वाघ यांनी हे सरकार गोरगरीबाचे आहे की दारूवाल्यांचे, असा सवाल केला आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. मंदिराच्या आधी बार उघडले आणि आता दारू परवान्यांवर थेट 50 टक्के सूट देण्यात आलीय. हे सरकार दारूवाल्यांवर इतके मेहरबान का आहे? की दारूवाले सरकारमधील काही मंत्र्यांवर मेहरबान आहेत का?, याचा शोध घेण्याची गरज वाटते, अशा शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे समाजातील इतरही घटकही त्रस्त झाले आहेत. वारंवार मागण्या करूनही त्यांना दिलासा मिळत नाही. दुसरीकडे दारू परवान्यांवर थेट 50 टक्के सूट या सरकारने दिली. दारूवाल्यांची सेवा हाच महाविकास आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे का, असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला आहे.
दारूवाल्यांबाबत तत्परतेने निर्णय घेणारे ठाकरे सरकार इतर घटकांबाबत मात्र निर्णय घेत नसल्याने या सरकारवर टीका होत आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

मालमत्ता करावरील शास्ती माफ -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त फोरम, फेडरेशन यांच्या दिशाभूलीमुळे …

Leave a Reply