Breaking News

उरण महाविद्यालयात ‘जागृत ग्राहक व स्मार्ट गुंतवणूकदार’ या विषयावर व्याख्यान

उरण : रामप्रहर वृत्त

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने ‘जागृत ग्राहक व स्मार्ट गुंतवणूकदार’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या सत्रात प्रमुख पाहुणे टी. आर. पांडे यांनी ‘ग्राहकवाद’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसर्‍या सत्रात गणेश भट्ट यांनी ‘स्मार्ट गुंतवणूकदार’ या विषयावर विचार मांडले. त्यांनी गुंतवणुकीचे महत्त्व सांगून गुंतवणूक कशी करावी याविषयी सविस्तर मागदर्शन केले. तिसर्‍या सत्रात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य बळीराम एन. गायकवाड यांनी आर्थिक साक्षरता व व्यवहारज्ञान जीवन जगताना अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या वेळी के. ए. शामा, प्रा. डॉ. ए. आर. चव्हाण, प्रा. एच. के. जगताप उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत व सूत्रसंचालन प्रा. डॉ. पराग कारूळकर यांनी केले, तर आभार डी.एल.एल. समन्वयक प्रा. व्ही. एस. इंदुलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. हन्नत शेख, प्रा. रियाज पठाण, प्रा. मयूरी, निकेतन शामा आदींनी मेहनत घेतली. या कार्यक्रमात 165 विद्यार्थी सहभागी झाले होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply