Breaking News

उरण महाविद्यालयाची एकांकिका महाअंतिम फेरीत

उरण ः वार्ताहर

‘लोकसत्ता एकांकिका 2019’ स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी गुरुवारी (दि. 12) गडकरी रंगायतन येथे जल्लोषात पार पडली.

या स्पर्धेत कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातर्फे सादर केलेल्या ‘हमीनस्तू’ या एकांकिकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले व राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत निवड झाली आहे. ‘गरफिर दौसबर रूये जमी अस्तू, हमीनस्तू हमीनस्तू हमीनस्तू’ धरतीवरील स्वर्ग कुठे आहे तर काश्मीर आहे. अशा काश्मीर खोर्‍यातील सध्याची धार्मिक, राजकीय वादाची परिस्थिती आणि एक प्रेमकथा यावर भाष्य करणारी ‘हमीनस्तू’ ही एकांकिका आहे, तसेच या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (निखिल पालांडे व गौरव रेळेकर), सर्वोत्कृष्ट लेखक (प्राजक्त देशमुख) अशी पारितोषिके मिळाली. एकांकिकेमध्ये महाविद्यालयातील कुमार गौरव सरफरे, सिध्देश मोरे, नेहा म्हात्रे, हर्षल मुकादम, प्रीतम घोष, जय पालकर, त्रिजन पाटील, निहाल स्वामी, समीर पाटील, प्रतीक्षा जोशी, कल्याणी म्हात्रे, श्वेता पाटील, प्राची जोशी, भूमिका म्हात्रे, तेजस्वी मोरे आदी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाग घेऊन यश संपादन केले.

Check Also

पनवेल महापालिकेचा 3991 कोटी 99 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

पनवेल ः प्रतिनिधी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्‍या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल …

Leave a Reply