Breaking News

जवानांना अनोखा सलाम; भारतीय क्रिकेटपटूंनी घातल्या आर्मीच्या कॅप

रांची : वृत्तसंस्था

पुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सलाम करण्यासाठी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या सामन्यापूर्वी आर्मीच्या कॅप परिधान केल्या. माजी कर्णधार व लोकल बॉय महेंद्रसिंह धोनीने खेळाडूंबरोबरच सहाय्यक स्टाफलाही हा कॅप्सचे वाटप केले. त्याचबरोबर देशवासीयांनी राष्ट्रीय संरक्षण निधीला सढळ हस्ते मदत करावी, जेणेकरून शहीद जवानांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळू शकेल, असा संदेशही या वेळी देण्यात आला आहे.

नाणेफेकीसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हीच आर्मी कॅप घालून आला होता. तो म्हणाला की, दहशतवादी हल्ल्यात जे भारतीय जवान शहीद झाले त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवण्यासाठी आम्ही आज आर्मीच्या कॅप्स परिधान केल्या आहेत. त्याचबरोबर आजच्या सामन्याचे सर्व शुल्क आम्ही राष्ट्रीय संरक्षण निधीला देण्याचे ठरवले आहे. देशवासीयांनीही या निधीला सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन मी करीत आहे. यापूर्वी 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला ट्वेन्टी 20 सामन्यात भारतीय खेळाडूंनी काळ्या फिती बांधून व मैदानावर मौन पळून शहिदांना श्रद्धांजली वाहिली होती.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply