Breaking News

सिडको निवारा पोस्ट लॉटरीचे लोकार्पण

बेलापूर : सिडको वृत्त : सिडको महामंडळातर्फे 14,838 परवडणार्‍या घरांची योजनेंतर्गत यशस्वी अर्जदारांची कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी सिडकोतर्फे निवारा ुुु.लळवले.पर्ळींरीरज्ञशपवीर.ळप या पोस्ट लॉटरी संकेतस्थळाचे मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या शुभहस्ते लोकार्पण गुरुवारी (दि. 7) सिडको भवन येथे करण्यात आले. या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक 2 अशोक शिनगारे, सहव्यवस्थापकीय संचालक एस. एस. पाटील, व्यवस्थापक (पणन-2)  लक्ष्मीकांत डावरे, जनसंपर्क अधिकारी   प्रिया रातांबे, प्रोबेटी सॉफ्ट प्रा. लि.चे संचालक जितेंद्र जोशी व सिडकोचे इतर अधिकारी उपस्थित होते. गृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांची सर्व आवश्यक कागदपत्रे अ‍ॅक्सीस बँकेच्या दिलेल्या शाखांमध्ये जमा करण्यास यापूर्वी कळवण्यात आले होते. तद्नंतर या संकेतस्थळांतर्गत यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी सिडको महामंडळाने नियुक्त केलेल्या मे. प्रोबेटी सॉफ्ट प्रा. लि. पुणे या अग्रगण्य कंपनीद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे पडताळणीसाठी ई-मेल, फोन व एसएमएसद्वारे ई-अपॉईंटमेंट देण्यात येणार आहे. सदर संकेतस्थळाची वेबलिंक ुुु.श्रेीींंशीू.लळवलेळपवळर.लेा या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संकेतस्थळाद्वारे अर्जदाराच्या प्रकरणाची सद्यस्थिती घरबसल्या बघता येणार आहे. कागदपत्रे पडताळणीसाठी या प्रणालीचे आवश्यक त्या सर्व शासकीय यंत्रणांशी सॉफ्टवेअरद्वारे इंटीग्रेशन करण्यात आले आहे. यशस्वी अर्जदारांना तक्रार करण्यासाठी ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली (जपश्रळपश ॠीळर्शींरपलश ठशवीशीीरश्र डूीींशा) ची स्थापना करण्यात आली आहे, तसेच तक्रारींचे निवारण करणेसाठी कॉल सेंटरची स्थापना, टोल फ्री नंबर इत्यादी अतिरिक्त सुविधा आठवड्यातील 6 दिवस, 12 तास उपलब्ध करून देण्यात येईल. अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रानुसार अर्जदारास पात्र अथवा अपात्र ठरविण्याचा अंतिम निर्णय सिडको महामंडळाद्वारे घेण्यात येईल. सदर निवारा केंद्राचा पत्ता : सिडको लि., बेलापूर रेल्वे स्टेशन, टॉवर नं. 10, आठवा मजला, सिडको नैना कार्यालया शेजारी, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई असा आहे. सोडतीमध्ये इरादित झालेली सदनिका अर्जदारास स्वेच्छेने रद्द करावयाची असल्यास अथवा ज्या अर्जदारांना एकापेक्षा जास्त सदनिका इरादीत झाल्या असतील, अशा अर्जदारांसाठी सरेंडर/रद्द असा विकल्पदेखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अर्जदारांनी रद्द केलेल्या सदनिका त्याच प्रवर्गातील प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांना सदनिका वाटपित करण्यात येतील, तसेच याबाबतची सर्व माहिती नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस व ई-मेलद्वारे देखील कळविण्यात येईल.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply