Breaking News

निराधारांना ब्लँकेटची ऊब; पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा उपक्रम

पनवेल ः वार्ताहर

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पनवेल परिसरातील थंडीत कुडकुडणार्‍या निराधारांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. निराधार आणि गरजू नागरिकांना पनवेल बसस्थानक, रेल्वेस्थानक, तक्का परिसरात मायेची ऊब देत ब्लँकेट वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पनवेलसह रायगड जिल्ह्यातून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कौतुक होत आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, कार्याध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष केवल महाडिक, सचिव रवींद्र गायकवाड, सहसचिव सुधीर पाटील, सहखजिनदार अनिल कुरघोडे, सल्लागार निलेश सोनावणे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद पोतदार, मयूर तांबडे, विवेक पाटील, मंदार दोंदे, ओमकार महाडिक, सुभाष वाघपंजे, शेखर भोपी, अ‍ॅड. मनोहर सचदेव, सुमेध वाघपंजे, प्रथमेश रेवाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply