Breaking News

कोस्टल रोड चौकात गतिरोधक बसवा

पोलीस निरीक्षक माणिक नलावडेंची मागणी

उरण ः प्रतिनिधी

उरण तालुक्यातील पूर्व विभागाला जोडणार्‍या खोपटापूल-भेंडखळ महामार्गावरील कोस्टल रोड चौकातील चारही बाजूंच्या ठिकाणी तत्काळ गतिरोधक बसवावा, अशा मागणीचे पत्र उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. खोपटापूल-भेंडखळ महामार्गावरील कोस्टल रोड चौकात मागील दोन वर्षात सातत्याने अनेक अपघात झाले असून, त्याचा फटका अनेकांना बसला आहे. या महामार्गावर अवजड वाहनांसह विविध प्रकारच्या वाहनांची वर्दळ नियमित होत आहे.त्याचप्रमाणे वाहनांवर नियंत्रण नसल्याने या चौकातून वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी (दि. 13) दोन चारचाकी कारच्या अपघातात एक वाहनचालक जखमी झाला आहे. त्यामुळे गतिरोधक इंडियन रोड काँग्रेसच्या निकषांप्रमाणे तयार करण्यात यावा. या ठिकाणी रस्त्यांच्या चारही बाजूस गतिरोधक बसविणारे फलक लावण्यात यावेत. गतिरोधकास सफेद रंगाचे पट्टे लावण्यात यावेत व रात्रीच्या वेळी गतिरोधक निदर्शनासाठी उघडझाप होणारे ब्लिनकर्स लावण्यात यावेत, अशा मागणीचे पत्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे उरण कार्यालयामार्फत रायगडच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठविण्यात आले आहे.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply