पनवेल : वार्ताहर : महाशिवरात्रीचे औचित्य साधून प्रभाग क्र. 17 मधील लोकमान्य नगर इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे शंकर मंदिराचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कार्यसम्राट नगरसेवक व प्रभाग ड समितीचे अध्यक्ष राजू सोनी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. या वेळी भाजपचे संजय जाधव, अशोक आंबेकर, राहुल वाहुलकर, रावसाहेेब खरात, चंद्रकांत राणे आदी इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना राजू सोनी यांनी सांगितले की, एक धार्मिक कार्य असून एक सुंदर असे शिवमंदिर सर्वसामान्य लोकांसाठी लवकरच उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper