Breaking News

पनवेल : ओम साईराम पदयात्री मित्र मंडळ नावडे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही नावडे ते श्रीक्षेत्र शिर्डी पालखी आणि पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला सोमवारी नावडे याथून सुरुवात झाली असून, सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पालखीला खांदा दिला व मंडळाच्या सदस्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेलचे नगरसेवक अमर पाटील, भाजप युवा मोर्चा पनवेल महानगरपालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, मंडळाचे अध्यक्ष विशाल खानावकर यांच्यासह साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply