Breaking News

आमचे पैसे परत द्या!

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण : खातेदार-ठेवीदारांची जोरदार मागणी

पनवेल ः प्रतिनिधी
कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणामुळे ठेवीदार आणि खातेदारांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आमच्या कष्टाचे आणि हक्काचे पैसे आम्हाला परत करा, अशी जोरदार मागणी करीत शेकडो खातेदार, ठेवीदारांनी कर्नाळा बँकेच्या अधिकार्‍यांना सोमवारी (दि. 16) घेराव घालत धारेवर धरले.
कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना न्याय देण्याची भूमिका आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी घेतली आहे. त्यामुळे आजपर्यंत पुढे न आलेले ठेवीदारही आपल्या हक्कासाठी जागरूक झाले आहेत. खातेदारांना 16 डिसेंबरला पैसे देण्याचे बँकेने कबूल केले होते, मात्र या वेळी ठेवीदार, खातेदारांचे लाखो रुपये असतानाही फक्त पाच हजार रुपये देण्याचा नाममात्र प्रयत्न केला गेला, मात्र अनेक ठेवीदारांनी ते पैसे घेण्यास नकार दिला. किती वेळा तारीख देता, आमचे सर्व पैसे द्या, अशा शब्दांत त्यांनी बँक अधिकार्‍यांना ठणकावले.
गेल्या चार महिन्यांपासून फेर्‍या मारतोय आमचे पैसे ताबडतोब द्या, अशी मागणी केली असता जा खुशाल पोलीस तक्रार करा, असे उर्मट उत्तर बँकेचे अधिकारी देतात. त्यामुळे विवेक पाटलांना बोलवा, अशी मागणी उपस्थितांनी केली असता विवेक पाटील अधिवेशनाला गेले असल्याचे उत्तर बँकेच्या अधिकार्‍यांनी दिले. यावर ग्राहकांनी आमदार नाहीत, मग कुठल्या अधिवेशनाला गेले, असा सवाल उपस्थित करताच कोणतेच उत्तर बँक अधिकार्‍यांना देता आले
 नाही, मात्र या बँकेच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक अनुभव खातेदार-ठेवीदारांना या वेळी आला.

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply