Breaking News

भाजपच्या रुचिता लोंढे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पनवेल महानगरपालिका पोटनिवडणूक

पनवेल ः प्रतिनिधी
राज्यातील विविध महापालिकांच्या रिक्त पदांसाठी 9 जानेवारीला पोटनिवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या कन्या रूचिता गुरुनाथ लोंढे यांनी आपला उमेदवारी अर्ज तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 16) निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दीपा भोसले यांच्याकडे सुपूर्द केला.
रूचिता या आर्किटेक्ट असून, स्वप्नील कल्याणकर आर्किटेक्चर फर्ममध्ये कार्यरत आहेत. त्यांना मुग्धाताईंच्या कार्याचा वारसा आहे. त्यामुळे दिवंगत मुग्धा लोंढे यांच्या शोकसभेवेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी रुचिता लोंढे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार रूचिता लोंढे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍यांकडे दाखल केला.
या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, संदीप लोंढे, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, प्रभाग समिती ‘ड’ अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, विकास घरत, दिलीप पाटील, अरुणकुमार भगत, निलेश बाविस्कर, नगरसेविका दर्शना भोईर, विद्या गायकवाड, राजेश्री वावेकर यांसह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान होणार असून, 10 जानेवारीला मतमोजणी आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply