Tuesday , February 7 2023

सीकेटी महाविद्यालयात एनसीसी दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी (दि. 16) एनसीसी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उत्तम असा प्रतिसाद लाभला.

सीकेटी महाविद्यालयातील एनसीसी विभागाने आतापर्यंत यशस्वी कार्यक्रम केले असून, या यशस्वितेचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. त्यातून अंकित कुलश्रेष्ठा (वायुसेना), मंगेश मांडवे (नौसेना), करण जोगे (सैन्यदल) हे महाविद्यालयाचे माजी छात्रसैनिक आज देशाची सेवा करीत आहेत. महाविद्यालयात या वर्षी एनसीसी दिवसाचे औचित्य साधून करण जोगे या आपल्याच माजी छात्रसैनिकाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते, तर प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, कॅप्टन डॉ. यू. टी. भंडारे, एनसीसी ऑफिसर नीलिमा तिदार, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, रोटरी क्लब पनवेलचे अध्यक्ष विश्राम एकांबे, कॅप्टन अमरसिंग लाल, एनसीसी कॅडेट्स व त्यांचे पालक, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकवर्ग उपस्थित होता.

यानिमित्त अनेक कलाकृती सादर करण्यात आल्या. त्यामध्ये सर्वप्रथम फ्लॅग ड्रिल, रायफल ड्र्रिल, मनोरे, एनआयपी-कोल्हापूर पुराची प्रात्यक्षिके यांचा समावेश होता. त्याबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. एनसीसी गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 

कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, सचिव डॉ. एस. टी. गडदे, प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी सहभागी विद्यार्थी व कार्यक्रमाचे नियोजन करणार्‍यांचे कौतुक केले.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply