Breaking News

कुस्ती स्पर्धेत वाडगाव आखाडा विजेता

रेवदंडा : प्रतिनिधी

अलिबागनजीक कुरूळ, वेश्वी, वाडगाव, बेलकडे परिसराशी संलग्न असलेल्या रसानी टेकडी येथे श्री स्वामी दत्तनाथ चैतन्यधाम ट्रस्टच्या सौजन्याने श्रीदत्त जयंती उत्सव नुकतास साजरा करण्यात आला. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत यजमान वाडगाव तालीम संघाने विजेतेपद पटकाविले.

हनुमान तालीम संघ वाडगाव व अलिबाग तालुका कुस्तीगीर संस्था यांच्या विद्यमाने ही भव्य कुस्ती स्पर्धा रंगली. स्पर्धेचा शुभारंभ अ‍ॅड. प्रसाद पाटील, काशिनाथ भगत, सुधीर वेंगुर्लेकर, प्रफुल्ल पाटील, अमित माळी, जयेंद्र भगत, सरिता भगत, निवास भगत, द्वारकानाथ नाईक आदींच्या उपस्थितीत झाला. स्पर्धेत द्वितीय क्रमांक काळभैरव आवास, तृतीय क्रमांक जोगेश्वरी मुंबई यांनी मिळविला. सर्व विजेत्या संघांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply