पनवेल : वार्ताहर
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलजवळील चिंचवण गावाच्या परिसरात बुधवारी (दि. 8) सकाळी उभ्या शिवशाही बसला पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या इर्टिका कारची धडक बसली. या अपघातात कारमधील एक जण ठार, तर तीन महिला जखमी झाल्या आहेत.
ठाणे येथील इव्हेंट मॅनेजमेंट करणारे सुप्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे हे सहकार्यांसह महाड येथील कार्यक्रम आटोपून बुधवारी सकाळी परतत होते. त्यांच्या ताब्यातील इर्टिका कार (एमएच 04 जीएम 2495) घेऊन ते चिंचवण गावाच्या हद्दीत आले असता शिवशाही बसचा टायर पंक्चर झाल्याने ती रस्त्यावर उभी होती. याचा अंदाज चालकाला न आल्याने इर्टिका कारने शिवशाही बसला पाठीमागून धडकली. या अपघातात कारमधील दीपेश मोरे गंभीररीत्या जखमी होऊन मृत्यू पावले, तर त्यांच्यासोबत असलेल्या सहकारी रश्मी खावणेकर या जखमी झाल्याने त्यांना पनवेलच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे श्रद्धा जाधव व कोमल माने किरकोळ जखमी झाल्या आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Check Also
पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …
RamPrahar – The Panvel Daily Paper