Monday , February 6 2023

सीकेटी विद्यालयात ‘फन फेअर’

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील पुर्व प्राथमिक विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या वतीने बुधवारी फन फेअर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनीे विविध खाद्यपदार्थ तसेच विविध स्वतूंचे स्टॉल लावले होते. सीकेटी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांच्या मार्गदर्शनाखालील या फन फेअरमध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही सहभाग नोंदवला. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उज्जवला कोटियन, मराठी विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply