नवी दिल्ली : सध्या रेशन दुकानावर गरिबांना गहू, तांदूळ, कडधान्ये, साखर, तेल या वस्तू कमी किमतीत वा सवलतीच्या दरात मिळतात. लवकरच अन्नधान्याबरोबरच स्वस्त दरात पोषणयुक्त मांसाहारी पदार्थदेखील रेशन दुकानावर मिळण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार रेशन दुकानातून गरिबांना स्वस्त दरात चिकन, मटण आणि अंडी उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. पोषण सुरक्षेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नीती आयोगाकडून ही योजना तयार केली जात आहे. बातमीनुसार अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार करून पोषण सुरक्षेला सरकार प्राधान्य देणार आहे. गरिबांना पोषण आहार सहज आणि कमी किमतीत उपलब्ध व्हावा, हा यामागील उद्देश आहे. सुरुवातीला किमान एक ते दोन प्रोटीनयुक्त पदार्थ रेशन दुकानावर उपलब्ध केले जातील, असे सांगितले जात आहे.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …