Breaking News

सीकेटी विद्यालयात आनंद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी)विद्यालयात मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील छोट्या विद्यार्थ्यांचा ’भव्य आनंद मेळावा’ शुक्रवारी (दि. 20) सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित करण्यात आला होता. आनंद मेळाव्याचे उदघाटन अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या आनंद मेळाव्यामध्ये सीकेटी संकुलातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मान्यवरांनी सर्व स्टॉल ना फिरून भेट दिली. या मेळाव्यात अंगणवाडी व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी विविध तर्‍हेचे स्टॉल लावले होते. त्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, स्नॅक्स, इत्यादिंचा सामावेश होता. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी अनेक वस्तूंची खरेदी केली व वेगवेगळया पदार्थांचा आस्वाद घेतला. या आनंद मेळाव्याच्या आयोजनामागील मुख्य हेतू म्हणजे लहान मुलांना सर्व भाज्यांची ओळख व्हावी, खरेदी विक्री करता यावी, हिशोब समजावा, पैशांची देवाण घेवाण करता यावी, सभाधिटपणा वाढावा, व्यवहार ज्ञान व्हावे, संभाषण कौशल्य वाढावे हा होता.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply