Breaking News

सदनिका खरेदीबाबत सिडकोचे आवाहन

आर्थिक नुकसान सोसावे लागल्यास हस्तक्षेप करणार नसल्याची स्पष्टोक्ती

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

नवी मुंबई क्षेत्रामध्ये सदनिका खरेदी करताना नागरिकांनी विकासक हाच त्या जमिनीचा अधिकृत भाडेपट्टाधारक आहे का, जमिनीचे हस्तांतरण विकासकाकडे कायदेशीररीत्या झाले आहे का, त्या जमिनीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क प्रलंबित आहे का, या बाबींची खात्री करावी असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे. सिडकोतर्फे 22.5% योजने अंतर्गत वाटपित करण्यात आलेल्या जमिनींच्या अनेक प्रकरणांमध्ये मूळ भूधारकांनी मूळ भूधारकांकरिता लागू असलेल्या आर्थिक सवलती मिळविण्याकरिता आपण स्वत:च जमीन विकसित करीत असल्याचे भासवून प्रत्यक्षात सिडकोला विश्वासात न घेता परस्पर विकासकाशी करार करून आपली जमीन विकासकाला विकसित करण्याकरिता दिली. अशा प्रकरणांमध्ये मूळ भूधारक व विकासक यांच्यातील वादामुळे भूधारकांना आर्थिक नुकसान सोसावे लागल्यास सिडको कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकणार नाही. या बाबींची नोंद घेऊन नवी मुंबई क्षेत्रात सदनिका खरेदी करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगत जमिनीचे मालकी हक्क, प्रलंबित शुल्क, भोगवटा प्रमाणपत्र इ. बाबींची खातरजमा करून घ्यावी. तसेच संबंधित प्रकल्पबाधित भूधारकांनीही अशा प्रकारचे व्यवहार सिडकोच्या पूर्व संमतीनेचे करावेत.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply