कर्जत : प्रतिनिधी
मराठी ही आपली मायबोली आहे. जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात, त्यांनी आधी मराठी शिक्षण घेतले पाहिजे. चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार मुलांवर रूजविणे गरजेचे आहे, अस मत ह.भ.प. मारूती महाराज राणे यांनी कर्जत भिसेगाव येथे
व्यक्त केले.
भिसेगाव येथे ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळ्यात दिपोत्सव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ह.भ.प. मारूती महाराज राणे बोलत होते. मातृभाषेतील शिक्षणामुळे मुलांवर चांगले संस्कार व प्रगती होण्यासाठी वेळ लागत नाही.
कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, नगरसेविका पुष्पा दगडे, माजी नगरसेविका यमुना विचारे, माजी नगरसेवक पुंडलिक भोईर, पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे, पोलीस पाटील संजय हजारे यांच्यासह भाविक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.