पनवेल : प्रतिनिधी
पनवेल रेल्वे स्टेशनवरून मुंबईला रवाना होणार्या कोईम्बतुर एक्सप्रेसमधील प्रवाशाची बॅग आणि पनवेल स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरील सी डब्ल्यू ऑफिसमधील कर्मचार्याचा मोबाइल पळवणार्या आरोपीस पनवेल रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे.
कोईम्बतुर एक्सप्रेसमधून प्रवाशाची 30 हजार रुपयांसह एकूण 35 हजारांचा ऐवज असलेली बॅग पनवेल स्टेशनवरून गाडी सुटताना एकाने पळवली. पनवेल रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक जसबीर राणा याबाबत माहिती मिळताच एएसआय के. पी. पांडे, शिपाई सचिन सरोहा व मोनु तोमर यांचेसह ते घटनास्थळी पोहचले. तसेच पनवेल रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 05 वरील सी डबल्यू ऑफिसचे कर्मचार्याचा मोबाइल चोरी झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोईम्बतुर एक्सप्रेस बॅग चोरणारी व सी डबल्यू ऑफिसचे कर्मचार्याचा मोबाइल चोरणारी व्यक्ती ही एकच
असल्याच समजले. पनवेल रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या नवनाथ नगर झोपडपट्टीत आरोपी रितिक राजू पवार (वय 20, पत्ता- वार्ड नं 13, सोमजावाडी, खोपोली) यांस पनवेल रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली.