Breaking News

पनवेल मनपा स्थायी समितीची ऑनलाइन सभा

विविध विषयांना चर्चेअंती मंजुरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. 25) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाइन पद्धतीने नवनिर्वाचित सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली.
स्थायी समितीच्या सभेला सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर  नगरसेवक अजय बहिरा, मुकीद काझी आदींसह अधिकारी उपस्थित होते.
या सभेत महापालिकेच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या माझे कुटूंब माजी जबाबदारी अभियानामध्ये सहभागी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांना अतिरिक्त दैनिक भत्ता मंजूर करणे, प्रभाग समिती ‘अ’मधील प्रभाग क्रमांक 1 मधील तळोजा मजकूर येथे नाल्याचे बांधकाम करणे, कोरोना रुग्णांची संगणकावर दैनंदिन नोंदणी करणे व ती पालिकेच्या पोर्टलवर अद्ययावत करण्याकरिता पर्यायी व्यवस्था न झाल्याने मे. सोलिस इनविक्टी एजन्सीला मुदतवाढ देण्याबाबत तसेच पनवेल शहरात कोरोना विषाणूमुळे उद्भवणार्‍या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या रुग्णांना वारंवार लागणारे आवश्यक ते साहित्य पुरविणे यांसारख्या विषयांवर चर्चा करुन त्यांना मंजुरी देण्यात आली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply