Breaking News

पेणमध्ये सात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आज निवडणूक

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी बुधवारी (दि. 10) संबंधीत ग्रामपंचायत कार्यालयात नेमणूक केलेल्या पीठासन अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली  निवडणूक घेण्यात येणार आहे.  पेण तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांनी महेंद्र पाटील (आंबेघर), प्रकाश मोकल (कामार्ली), राकेश कलमकर (वाक्रुळ), निनाद पाध्ये (काळेश्री), दत्तात्रेय साळुंखे (बोर्झे), रत्नाकर सूर्यवंशी (जोहे) आणि दादासाहेब सोनावणे (खारपाले) या मंडळ अधिकार्‍यांची पिठासन अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2वाजेपर्यंत सरपंच पदाच्या निवडणुकीचे कामकाज चालणार असून या वेळेत उमेदवारी अर्ज सादर करणे, अर्ज माघारी घेणे व यानंतर विशेष सभेत सरपंच पदासाठी मतदान घेणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply