नागोठणे : प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठ आयोजित रायगड जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा खालापुरातील विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आली. स्पर्धेत जिल्ह्यातील 197 प्रकल्प सहभागी झाले होते व त्यात नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातील 8 प्रकल्पासह 18 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यातील एक प्रकल्प विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. प्रा. चैत्राली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिक्षा दिघे, विशाखा गुरव, निवेदिता म्हात्रे व हर्षाली टिकोणे यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. या स्पर्धेसाठी जिल्हा समन्वयक म्हणून प्रा. डॉ. दिनेश भगत यांनी काम पाहिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली प्रा. डॉ. स्मिता मोरबाळे यांनी टीम लिडर म्हणून काम पाहिले होते.