Breaking News

युवा नेते परेश ठाकूर यांना डॉक्टरेट

केईआयएसई युनिव्हर्सिटीने घेतली दखल

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश रामशेठ ठाकूर यांच्या सर्वंकष कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय केईआयएसई इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने त्यांना डॉक्टरेट ही पदवी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. 27) श्रीलंकेत होणार्‍या पदवीदान समारंभात ही पदवी त्यांना बहाल केली जाणार आहे.
परेश ठाकूर यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव योगदान आहे. त्यांनी विविध संस्था तसेच महत्त्वाच्या राजकीय पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. ते विविध उपक्रमांत सहभागी होऊन संबंधित संस्था आणि व्यक्तींना प्रोत्साहन देतात. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. पनवेल महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. परेश ठाकूर हे सभागृह नेते या भूमिकेतून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असतात. घनकचरा व्यवस्थापन,
प्लास्टिक निर्मूलन, त्याचबरोबर प्रक्रिया झालेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर या पर्यावरणविषयक विषयांवर त्यांनी आग्रही भूमिका घेत सक्रिय पुढाकारही घेतला. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य आदर्शवत व उल्लेखनीय असल्याने त्यांच्या अनेक कामांची दखल केईआयएसई या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने घेत परेश ठाकूर यांना डॉक्टरेट बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply